एकनाथ शिंदे यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा- प्राध्यापक ज्योतीताई वाघमारे
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात विकासाचा महापूर महाराष्ट्रात आणला असून शासनाचा पैसा कष्टकरी शेतकरी शेतमजूर महिला यांच्यापर्यंत पोहोचवला आहे देशात एक नंबरचे राज्य करण्यासाठी महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी कामाला लागावी असे आव्हान शिवसेनेच्या प्रवक्ते ज्योतीताई वाघमारे यांनी केले.करमाळा येथे बांधकाम 401कामगारांना दुसऱ्या टप्प्यातील जवळपास 43 लाख रुपये किमतीचे भांडी संसार उपयोगी साहित्य वाटण्यात आले.यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटेयुवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे,तालुकाप्रमुख राहुल कानगुडे,शहरप्रमुख संजय शीलवंत जेऊर चे शहर प्रमुख बाळासाहेब करपे माधव सूर्यवंशी,युवासेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंडनागेश शेंडगे संजय जगताप प्रदीप बनसोडे शिवसेनेचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट शिरीष लोणकर, उद्योजक संतोष गुगळे निलेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे यांनी 2800 बांधकाम कामगार नोंदणी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.शिवसेनेच्या माध्यमातून आठ हजार पाचशे कामगारांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.यावेळी बोलताना प्राध्यापक ज्योतीताई वाघमारे म्हणाले की लाडकी बहीण मोफत एसटी प्रवास पिक विमा अनुदान मोफत लाईट शेतकऱ्यांना मोफत वीज पीक लागवडीसाठी अनुदान अशा अनेक योजना थेट शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या निर्माण केले आहे.
करमाळ्यातूनही शिवसेनेचा उमेदवार निवडून देणे काळाची गरज आहे.एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण म्हणून तालुक्यातील प्रत्येक महिलेने करमाळ्यातून शिवसेनेचा धनुष्यबाणाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा असे आव्हान केले.यावेळी बोलताना मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातपात धर्म न मानता सर्वसामान्य नागरिक डोळ्यापुढे ठेवून काम करतात.एकनाथ शिंदे साहेब शंभर टक्के समाजकारण करतात यामुळे राजकारण करताना त्यांना कोणता त्रास होत नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा महाराष्ट्राचा चेहरा झाला असून सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य करणारा नेता म्हणून त्याची खाती संपूर्ण राज्यात झाली आहेयेणारा महाराष्ट्राचा भविष्यकाळ उज्वल करायचा असेल तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे त्यासाठी शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीच्या सर्व उमेदवाराच्या पाठीशी मतदारांनी उभे राहावे असे आवाहन केले.
+++++
रोहिणी फंड
लाभार्थी स्वयंपाक साहित्य
भांडी संच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली भांडी अत्यंत मजबूत असून किमान वीस वर्षे त्याला वापरले तरी ते खराब होणार नाही यामध्ये कुकर पाण्याची टीप पाच डबे पाच ते आठ पाच चमचे कढई सह स्वयंपाकासाठी लागणारे सर्व साहित्य असून या साहित्याची बाजारात किंमत दहा हजार आठशे रुपये आहे हे साहित्य मला मोफत मिळाल्यामुळे मला फार आनंद झाला आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मला आता 1500 रुपये महिन्याला मिळणार असून माझ्या बचत गटाला दोन लाख रुपयांचे विना व्याजाचे कर्ज मिळाले आहे.
या शासनाच्या योजना मुळे आता मी स्वावलंबी झाली आहे *++++++////
महेश चिवटे
शिवसेना जिल्हाप्रमुख
करमाळा तालुक्यातील रुग्णांना आतापर्यंत एक कोटी तीस लाख रुपयांची आर्थिक मदत मिळून दिली आहे विविध शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची थेट आर्थिक मदत सर्वसामान्यांना मिळून दिली आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करमाळ्यातील शिवसेनेच्या कार्यालयातून राज्य शासनाच्या सर्व योजनांची माहिती व मोफत अर्ज भरून दिले जातात याचा फायदा जनतेने घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
