करमाळासकारात्मक

सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल संगोबा ते घारगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे रस्त्याची झाली होती दुरावस्था दुरूस्तीचे काम सुरू

घारगाव प्रतिनिधी

संगोबा ते घारगाव पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे नागरिकांना शेतकऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते हा रस्ता मराठवाड्याला जोडला गेलेला आहे या रस्त्यावरून सारखी रहदारी चालू आहे नाहक सर्वांना याचा त्रास होत आहे सदरचा रस्ता मराठवाड्यातील परांडा भूम धाराशिव ला जोडणारा आहे सदर रस्त्यावर मराठवाड्यात जाणाऱ्या वाहनांची बऱ्यापैकी ये जा होत असते तसेच घारगाव येथील पाझर तलाव क्रमांक ३ या ठिकाणी कॉर्नरला असणाऱ्या पुलाला देखील मोठमोठे दोन भगदाड पडलेले आहेत त्या ठिकाणी उसाचे ट्रॅक्टर दुधाचे टेम्पो एस टी महामंडळ आणि प्रवाशांची शालेय विद्यार्थ्यांची सतत ये जा असते त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत आणि कार्यवाही करावी असे घारगावचे सामाजिक कार्यकर्ते श्री संजय सरवदे, चेअरमन काशिनाथ होगले, माजी सरपंच किरण दादा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला फोन द्वारे कळविले होते त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी येऊन पाहणी करून त्वरित कार्यवाही करून रस्ता दुरुस्त करण्याचे व पुलाला पडलेल्या खड्ड्याचे काम व कठडा बांधण्याचे काम चालू केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group