करमाळा

करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा तहसीलदार सौ.शिल्पाताई ठोकडे यांचे आंतरविभागीय क्रिडा स्पर्धेमध्ये उल्लेखनीय सुवर्ण यश

करमाळा प्रतिनिधी करमाळ्याच्या कर्तृत्वदक्ष तहसीलदार सौ शिल्पाताई ठोकडे मॅडम यांनी आंतर विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन घवघवीत यश मिळवले असुन करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये स्पर्धा संपन्न झाली असून सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करुन आंतरविभागीय अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धांमध्ये करमाळा तालुक्याच्या वतीने तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये करमाळा तालुक्याचे नाव उंचवण्याचे काम केले असून थाळी फेकीत पहिला भाला  गोळा फेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे.जीवनामध्ये यश प्राप्तीसाठी जिद्द चिकाटी परिश्रम याची गरज असून हीच खरी यशाची गुरुकिल्ली असल्याचे मत करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम यांनी व्यक्त केले. करमाळा तालुक्याचे प्रशासन यशस्वीपणे संभाळून कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडुन क्रिडा स्पर्धेमध्ये त्यांनी मिळवलेले यश नक्कीच उल्लेखनीय प्रेरणादायी आहे.
आंतर विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल ‌ जनशक्ती ‌ संघटनेचे अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे पाटील ‌ ज्येष्ठ पत्रकार आशपाक भाई सय्यद ‌ डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी तहसील कार्यालय कर्मचारी अधिकारी वर्ग नागरिक उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group