कुणाच्या जाण्याने आम्ही संपणार नाही तर अधिक ताकतीने आणि दहा पटीने वाढणार-‘ दिग्विजय बागल.
*करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक देवळाली गावचे सरपंच आशिष गायकवाड यांचा देवळालीत सोमवारी ४ तारखेला आमदार संजयमामा शिंदे गटात जाहीर कार्यक्रमात प्रवेश झाला होता. यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केलेलं भाषण चांगलेच गाजले होते. या प्रवेशामुळे आमदार शिंदे गटातही उत्साहाचे वातावरण आहे. या प्रवेशावर बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी म्हटले आहे की, ‘सध्या पक्षप्रवेशाचा जोरात गलका चालला आहे म्हणे..!
चार माणसे सोडून गेली म्हणून बागल गट मोडकळीस आला म्हणून समजणाऱ्यांनो
कुणाच्या जाण्याने बागल गट आम्ही संपणार नाही तर अधिक ताकतीने आणि दहा पटीने वाढणार हा आमचा शब्द आहे. आज अडचणीत असताना ज्यांनी पळ काढला त्यांना आम्ही येत्या निवडणुकीत १०० टक्के पश्चात्ताप करायला लावणार, हा आमचा शब्द आहे. बागल गटामध्ये अजूनही स्व. डिगामामांच्या विचारांची लोकं आहेत आणि नेहमी ती असणारच..!!’ असे त्यांनी म्हटले आहे.
दिग्विजय बागल यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये मजकूर टाकत कार्यकर्त्यांशी संवाद करतानाचे फोटोहो ही शेअर केले आहेत. बागल यांचे फेसबुक पेज अद्याप व्हेरीफाय नसले तरी त्याच फेजवरून ते अनेकदा भूमिका मांडत असतात. त्यांनी काही दिवसांपासून तालुक्यात दौरेही वाढवले आहेत.
शेटफळ येथील दूध डेअरीचे चेअरमन मनोहर दादा पोळ यांचीही निवासस्थानी जाऊन बागल यांनी भेट घेतली. याचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. दिग्विजय बागल सध्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. त्यातूनच त्यांनी गायकवाड यांचा उल्लेख न करता प्रवेशावर भाष्य केले आहे.
‘आज अडचणीत असताना ज्यांनी पळ काढला त्यांना आम्ही येत्या निवडणुकीत १०० टक्के पश्चात्ताप करायला लावणार’, असे म्हणत एकप्रकारे बागल यांनी आव्हानच दिलेले आहे. बागल गटामध्ये अजूनही स्व. डिगामामांच्या विचारांची लोकं आहेत आणि नेहमी ती असणारच..!!’ असेही त्यांनी म्हटले आहे. ‘कुणाच्या जाण्याने आम्ही संपणार नाही तर अधिक ताकतीने आणि दहा पटीने वाढणार’ असेही बागल म्हणाले आहेत. यावरून येत्या निवडणुकीत बागल गटाची रणनीती काय असेल हे पहावे लागणार आहे.