Tuesday, April 22, 2025
Latest:
Uncategorized

करमाळा शहरात डेंग्यू चिकनगुणियाची साथ असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे – सौ. स्वातीताई फंड

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरामध्ये डेंगू चिकनगुनिया यांची साथ मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असे मत करमाळा नगर पालिका प्रभाग क्रमांक 3 च्या नगरसेविका बांधकाम समिती सभापती सौ. स्वाती महादेव फंड यांनी व्यक्त केले. करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील फंड गल्ली, सुतारगल्ली, नागराज गल्ली, गवंडी गल्ली, दत्तपेठ येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन जंतुनाशक औषधाची फवारणी तसेच नागरिकांना डेंगू आजाराविषयी सतर्क राहून कोरडा दिवस पाळुन स्वच्छतेचे नागरिकांना महत्त्व सांगितले.जंतुनाशक फवारणी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी सुपरवायझर राजेंद्र बोकन मयुरलाल बेग,सुनिल म्हैतर ,घनशाम म्हैतर विक्रम म्हैतर ,पुरनलाल बेग विजयलाल बेग यांनी परिश्रम घेतले यावेळी नगरसेविका सौ स्वातीताई फंड, नगरसेवक अतुल फंड,जनतेचे नगरसेवक महादेव आण्णा फंड उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group