Saturday, April 4, 2026
Latest:
करमाळा

लंम्पीने ग्रास्त असलेल्या जनावरांसाठी विलगीकरण सेंटरची परवानगी द्या : सरपंच डॉ. अमोल दुरंदे

राजुरी प्रतिनिधी
लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, आज राजुरी गावांमध्ये एका शेतकऱ्याची दुधाळ गाई लम्पी मुळे मृत्यू पावली, डॉक्टरांनी 8 दिवस शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा गाय वाचविण्यात यश मिळाले नाही,आज सर्व शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक तलाठी,पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृत जनावराची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. तसेच गावांमध्ये लंपीची लागण असलेले अनेक जनावरं आहेत, लंम्पी हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे तो जलदगतीने पसरत आहे.तरी लवकरचं लम्पि ने ग्रास्त असलेल्या जनावरांसाठी विलगीकरण सेंटरची परवानगी ग्रामपंचायतीला मिळावी.
अशी मागणी राजुरी चे लोकनियुक्त सरपंच व सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!