शिवसेनेच्यावतीने बांधकाम कामगार 401 महिलांना दहा हजार रुपयांचे भांड्याचे वाटप उद्या शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे मंगेश चिवटे करमाळ्यात
करमाळा प्रतिनिधी
संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू प्रवक्त्या प्राध्यापक ज्योतीताई वाघमारे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता पक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उद्या मंगळवार दिनांक 17 जुलै रोजी करमाळ्यात येत असून सकाळी 11 वाजता त्यांच्या हस्ते बांधकाम कामगार 401 महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे भांड्याचे देण्यात येणार आहे.
यावेळी बचत गटातून महिलांना स्वावलंबी करण्यासंदर्भात आलेल्या विविध कर्ज व अनुदानाच्या योजना संदर्भात प्राध्यापक ज्योतीताई वाघमारे मार्गदर्शन करणार आहेत.शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्यातील आतापर्यंत 2600 कामगारांची नोंद झाली आहे.आठ हजार पाचशे कामगारांची नोंद करण्याची उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले आहे.या नोंदणी धारक बांधकाम कामगारांना शासनाचे 28 फायदे दिले जात आहेत. शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी ज्योतीताई शिंदे व त्यांचे सर्व सहकारी या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत.या कार्यक्रमासाठी बचत गट व लघुउद्योग करणाऱ्या इच्छुक महिलांनी उपस्थित राहावे असे आव्हान उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख संजय शीलवंत यांनी केले आहे.
[