करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यांनी चालू हंगामाचे उसाचे दर जाहीर करावेत -भाऊसाहेब झोळ ..
.
केत्तूर ( अभय माने) 2022 /23 चा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरला साखर कारखाने चालू करण्यास महाराष्ट्र राज्य मंत्री समितीने परवानगी दिलेली आहे. कारखाने गाळप सुरू करण्यास सज्ज होत आहेत परंतु चालू गळीत हंगामाच्या ऊसाच्या दराची कोंडी अजून कोणी फोडली नाही तसेच काही कारखान्यांची गत हंगामातील एफआरपी अजून देणे बाकी आहे . नवीन चालू हंगाम सुरू होणार आहे तरी मागील देनी दिलेली नाहीत शेतकरी बिलाच्या प्रतीक्षेत आहे तरी ज्यांची देणी अद्याप बाकी आहेत त्या कारखान्यांनी मागील देणी द्यावीत व चालू वर्षाचे उसाचे दर जाहीर करूनच कारखाने चालू करावेत अन्यथा समस्त शेतकरी बांधव व स्वाभिमानी शेतकरी संघटना कारखाने चालू करून देणार नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब झोळ यांनी आवाहन केले आहे
