करमाळासकारात्मक

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या- सरपंच परिषदेची मागणी*

करमाळा प्रतिनिधी
काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे करमाळा तालुक्यातील शेत जमिनीचे व पिकांचे तसेच फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. म्हणून आज सरपंच परिषद करमाळा तालुक्याच्या वतीने आमदार संजयमामा शिंदे व तहसीलदार समीर माने करमाळा यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली, यावेळी तानाजीबापू झोळ,सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे,तालुका समन्वयक सुजित बागल, तालुका समन्वयक भोजराज सुरवसे, तालुका उपाध्यक्ष भगवाण तनपुरे,सरपंच विनोद जाधव, सरपंच विजय गोडगे, सरपंच सतीश ओहोळ, सरपंच दादासाहेब गायकवाड,सरपंच मदन पाटील उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group