करमाळा बंदला भारत मुक्ती मोर्चा ने दिला पाठींबा
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि बहुजन महापुरुष यांच्या बद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, प्रसाद लाड, रावसाहेब दानवे, मंगल प्रसाद लोढा यांनी जाणीवपूर्वक वारंवार अपशब्द बोलून अवमान करत आहेत. त्यामुळे समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. याचा निषेध करत बुधवार दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी करमाळा शहर आणि तालुकाच्या समस्त शिवप्रेमीनी पुकारलेल्या करमाळा बंद ला भारत मुक्ती मोर्चा आणि त्यांच्या ऑफसुट विंग छत्रपती क्रांती सेना आणि राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा च्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन करमाळा तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे गौतम खरात, कय्युम शेख, दिनेश माने, विनोद हरिहर, दीपक भोसले, भीमराव कांबळे, छत्रपती क्रांती सेनेचे बाबुराव पाटील, आर आर पाटील, रावसाहेब जाधव, रवी गोडगे, दादा वायकुळे, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे शहाबुद्दीन शेख, कादिर शेख, अमीर मोमीन, मैनुद्दीन शेख, मजनू शेख, जावेद मणेरी, शहानवाज कुरेशी, मतीन आत्तार, शोएब कुरेशी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
