करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण येथील महादेव मंदिर येथे खांबातुन तेल पाझरण्याचा चमंत्कार याबाबत गुढ कायम
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण येथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर सुमारे दोन ते तीन शतका पूर्वीचे असल्याचे सांगण्यात येत असून हे मंदिर महादेवाचे जागृत देवस्थान असून या मंदिरातील गाभाऱ्यातील दोन दगडी खांबामधून आठ दिवसामधुन तेल पाझरत असून हा खरा देवी चमत्कार का विज्ञान याचा शोध घेतला जात आहे. मिरगव्हाण येथील रहिवासी निसर्ग उपचार तज्ञ कृष्णा कोंडलकर यांनी मिरगव्हाण येथे जाऊन खांबातून तेल पाझरण्याचा व्हिडिओ शेअर केला असून या मंदिराच्या बाबत येथे तेल पाजरण्याचे कारण शोधून महादेव भक्तांनी व धार्मिक गुरूंनी मार्गदर्शन करावे असे आवाहन येथील ग्रामस्थ करीत आहेत. खांबातुन तेल पाझरते हा चमत्कार बघण्यासाठी अनेक भाविक लोक नेते भेट देत असून या हा चमत्कार नक्की कशामुळे होतो हे अद्यापही समजले नाही. त्याचा शोध अध्यात्मिक गुरु महाराजांनी लावून महादेवाची कृपा होती आहे का काही अनुष्ठान देवी चमत्कार हे शोधावै लागणार आहे याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे.
