करमाळा

माढेश्वरी बँकेचे करमाळयाचे आमदार.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते सभापती विक्रम शिंदे यांच्या उपस्थितीत करमाळा शाखेचे नवीन इमारतीत स्थलांतर                   

करमाळा प्रतिनिधी भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत सभासदांच्या विश्वासास पात्र राहून केलेल्या पारदर्शक कारभारामुळे दरवर्षी माढेश्वरी बँकेला चांगला नफा मिळतो शिवाय सभासदांना लाभांश वाटप केले जाते.विशेष बाब म्हणजे सर्वांच्या सहकार्याने लवकरच बँक दोनशे पन्नास कोटींचा टप्पा गाठेल असे प्रतिपादन माढ्याचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी केले आहे.ते करमाळा येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलनाने माढेश्वरी बँकेच्या शाखेचे नूतन इमारतीत स्थलांतर केल्यानंतर बोलत होते.यावेळी व्हा.चेअरमन अशोक लुणावत यांनी सांगितले की,आमच्या ताब्यात बँक आली तेव्हा अवघे 500 सभासद होते ते आता 11 हजारांहून अधिक झाले आहेत. ठेवींची रक्कम 5 लाखांवरून 195 कोटी झाली आहे.चेअरमन आमदार बबनराव शिंदे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली एनपीए रोखण्यात बँकेला यश आले असून बँकेच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबविले जातात.या शाखेने अवघ्या चार वर्षांत 13 कोटींचा व्यवसाय केला असल्याचे त्यांनी सांगितले.पुढे बोलताना विक्रमसिंह शिंदे म्हणाले की,ज्या आधुनिक व अद्ययावत सुविधा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दिल्या जातात त्या सर्व सुविधा माढेश्वरी बँकेमध्ये दिल्या जातात त्या सर्व सुविधा आणि उपक्रमांचा गरजू सभासदांनी लाभ घ्यावा तसेच शहराच्या बाजूला असलेली शाखा आता मुख्य शहरात आल्याने त्याचा फायदा व्यापारी व ग्राहकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.आभार बँकेचे संचालक उदय माने यांनी मानले.यावेळी पंचायत समिती सदस्य ॲड. राहुल सावंत,करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील सावंत, नगरसेवक , संजय सावंत, महादेव फंड, दादासाहेब सावंत, भोजराज सुरवसे, माढेश्वरीचे संचालक डॉ.गोरख देशमुख,मुख्य कार्यकारी संचालक दत्तात्रय मुळे, वरिष्ठ अधिकारी निलेश कुलकर्णी, शाखाधिकारी नंदकुमार शेटे, मानसिंग खंडागळे,राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष आशपाक जमादार,दत्तात्रय जगदाळे,,दत्तात्रय अडसूळ,शहाजी झिंजाडे,गौतम ढाणे,जितेंद्र क्षीरसागर,हाजी फारुक बेग,सागर काळे,निलेश जगताप,अनिल कदम,केशव ढेरे, ओंकार मनसुके,दयानंद पवार,बापू भांगे,अक्षय कवठे,प्रदीप शिंगटे,नितीन नवले यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!