करमाळा शहराच्या वैभवात भर टाकणारे राजेरावरंभा काळातील पुरातन महादेवाचे मंदिर खोलेश्वर मंदिर
करमाळा शहराच्या वैभवात भर टाकणारी अनेक पुरातन पेशवेकालीन मंदिरे राजे रावरंभा निंबाळकर यांच्या कारकिर्दीत उभारण्यात आली आहेत. त्यापैकी शहरातील किल्ला वेस येथील महादेवाची भव्य आखीव रेखीव खोलेश्वर मंदीर आहे. या मंदिरात दर सोमवारी अनेक भाविक दर्शनासाठी येतात. तसेच वर्षा मध्ये अनेकवेळा धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवार श्री खोलेश्वर महादेवाची रथामध्ये सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात येते. हा रथ पूर्ण सागवानी लाकडाचा असून अतिशय सुबक पणे त्याची रचना केली आहे. त्याच्यावरील नक्षीकाम श्री देवीचा माळ येथील कमलाभवानीदेवीच्या मंदिरा मधील दगडी रथ एक सारखे असल्याचे दिसून येते. या रथाला माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी चांदीचा कळस २०२१ साली बसवलेला आहे. या रथाची खोलेश्वर आरती मंडळाच्या वतीने मिरवणूक काढली जाते.
करमाळा शहरातील नागरिकांचे श्रद्धा स्थान असलेल्या या मंदिरातील नंदीची मिरवणूक माघ शुद्ध महिन्यातील महाशिवरात्री नंतर येणार्या पाहिल्या गुरुवारी निघते. तसेच कोष्टी समाजाच्या वतीने या ठिकाणी श्रावण महिन्यात शिवनाम सप्ताहाचे आयोजन परंपरेत नुसार अनेक वर्षा पासुन करण्यात येत आहे. हळद कुंकू अर्पण केल्यामुळे मूर्तीची झीज झाली होती त्यामुळे आरती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पिंडी सारखं चांदीचा मुकुट बसविलेला आहे. तसेच श्री देवीचा माळ येथील विष्णु मूर्ती वेशीतील महादेवाची पिंड व किल्ल्यातील श्री गणेश मूर्ती या येकच दगडाच्या बनविण्यात आले आहे असे सांगण्यात येते. बांधकामाची रचना मंदिरातील खांब हे श्री देवीचा माळ येथील मंदिर रचणे प्रमाणे दिसून येते या वेशीमध्ये महादेवाबरोबरच ब्रह्मा विष्णु अशी वेगवेगळी मंदिर आहे गेल्या पंधरा वर्षांपासून शहरात काही तरुणांनी खोलेश्वर मंदिराचे पुजारी नागेश गुरव यांच्यासह मिळून श्री खोलेश्वर आरती मंडळाची स्थापना केली आहे. लोकसहभागातुन शहरातील लोकांच्या वर्गणीतुन मंदीराचे कार्यक्रम संप्पन होत आहेत. यामधील अनेक युवक धार्मिक कार्यक्रमासाठी योगदान देतात. दैनंदिनी आरती वेळी भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
