आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिम्मित १००० वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण- लक्ष्मीकांत पाटील
केत्तूर प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात आमदार संजयमामा शिंदे यांचा वाढदिवस रक्तदान, वृशारोपण आणि विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरा होत असुन, करमाळा तालुक्यात विविध भागात वृक्षारोपणाचे कार्यक्रम देखिल घेण्यात आले.. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत पाटील व मित्र परिवाराने तालुक्यात एक हजार झाडे लावण्याचा संकल्प या निमित्ताने केला असुन, ज्येष्ठ नेते सुर्यकांत भाऊ पाटील, दुध संघाचे कॉंग्रेस राजेंद्रसिंह पाटील व ॲड. अजित विघ्ने यांचे मार्गदर्शनातुन त्यांनी करंज व इतर झाडांचे वाटप केलेले असुन त्यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक करण्यात येत आहे. तसेच वृक्षारोपन करण्याकरिता कोणाला झाडे आवश्यक असतील तर त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
