Sunday, April 20, 2025
Latest:
आध्यात्मिककरमाळासकारात्मक

करमाळ्यात मुस्लिम बांधवाकडून नवरात्रीचे उपवास

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील सुमंतनगर.   येथील रहिवासी तसेच भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे तालुकाध्यक्ष वसीम राजू सय्यद हा युवक मागील तीन वर्षापासून आई जगदंबेचे नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करत आहे,
करमाळा तालुक्यात इतर तालुक्या – पेक्षा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे बरेच उदाहरण आहेत ,मग मुस्लिम बांधवांनी गणपती विसर्जनाच्या वेळेस गणपतीवर फुलांचा वर्षाव असो वा हिंदू बांधवांनी रमजानच्या महिन्यात केलेली इफ्तार पार्टी असो त्यातच अजून एक भर म्हणून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण म्हणजे वसिम सय्यद या युवकाने केलेला नवरात्रीचा उपवास, हा उपवास करत असताना हा युवक नऊ दिवस पायात चप्पल घालत नाही आणि परंपरेनुसार नवव्या दिवशी आई कमला भवानीला नैवैद्य दाखवून उपवास सोडतो ,
या गोष्टीची दखल घेऊन आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याला अजून पक्के करण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी भाजपा संपर्क कार्यालयात वसीम सय्यद यांचा फेटा घालून व श्रीफळ देऊन सत्कार केला , यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस किरण बोकन ,तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे , प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील ,भैय्या कुंभार ,मनोज मुसळे ,पप्पू काळे ,संजय किरवे, नवाज मुजावर, विनोद इंदलकर उपस्थित होते,

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group