करमाळासकारात्मक

हिवरवाडीचे माजी सरपंच राजेंद्र मेरगळ यांचा सपत्नीक वर्षावर सत्कार सौ वृषाली श्रीकांत शिंदे यांनी केले औक्षण

 

करमाळा /प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता या फराळाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले हिवरवाडी येथील सरपंच राजेंद्र मेरगळ व त्यांच्या पत्नी अनिता मेरगळ यांचा सत्कार व औक्षण खासदार श्रीकांतशिंदे यांच्या
सुविद्या पत्नी वृषाली ताई शिंदे यांनी केले व त्यांना साडी ड्रेस व सोन्याची नथ देऊन त्यांचा गौरव केला

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने 50 हजार रुपये अनुदान जाहीर केली असून या योजनेत पात्र झाल्यामुळे राजेंद्र मे रगळ यांच्या खात्यावर 41 हजार रुपये अनुदान जमा झाले अल्पभूधारक असताना सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने शेती करून इतर शेतकऱ्यांकडे आदर्श ठेवला आहे

मुंबई येथील वर्षा निवासस्थानावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते मे रगळ पती-पत्नीचा सत्कार करण्यात आला

या सत्कार नंतर बोलताना राजेंद्र मिरगळ म्हणाली की माझ्या आयुष्यातला हा महत्त्वाचा क्षण असून आत्तापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना एवढा सन्मान दिलेला नाही आज माझ्याबरोबर आलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील 38 शेतकरी दांपत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या धर्मपत्नी लता शिंदे यांनी औक्षण करून फुल आहेर करून सोन्याची नथ देऊन सत्कार केला व हे करत असताना शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असून शेतकऱ्यांनी खचून न जाता शेती करावी असे दिलेले आश्वासन मनाला भरून गेले इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानावर जेवण भोजन सन्मानाने मिळाले आम्हाला आनंद आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group