पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा स्मारक समिती सोलापूर प्रा.शिवाजीराव बंडगर यांचा समिती मध्ये समावेश करमाळा तालुक्याचा सन्मान

करमाळा प्रतिनिधी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या आहिल्यादेवी होळकर पुतळा स्मारक समितीमध्ये सोलापुर जिल्ह्यातील कृती समितीचे अध्यक्ष तथा करमाळा बाजार समितीचे सभापती उजनी धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर व आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. सोलापुर विद्यापिठाच्या आवारात होणा-या अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक समितीची स्थापना करण्यात आली असून त्यामधे नव्याने सोलापुर विद्यापीठाच्या नामांतर कृती समितीचे अध्यक्ष व करमाळा क्रषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर व आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच भव्य स्मारक अर्थातच पुर्णाकृती अश्वारूढ पुतळा विदयापीठाचे आवारात उभारण्यात येणार आहे .त्यासाठी सोलापुर जिल्ह्यातील काही मान्यवरांनी या समितीवर जिल्ह्यातील नेत्यांना घेण्याचा आग्रह धरण्यात यापूर्वी काही सदस्यांची नियुक्ती या समिती वर करण्यात आली आहे. परंतु या मध्ये सोलापुर जिल्हयाच्या बाहेरच्या लोकांचा सहभाग होता . त्यामुळे सर्व स्तरातून याचा विरोध होत होता . आता या समितीवर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सह विदयापीठाला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं नाव मिळवण्यासाठी अविरत संघर्ष केलेल्या पैकी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे . त्यामुळे करमाळा तालुका तसेच नामांतर कृती समिती सोलापुर यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन त्यांच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
