लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या-आमदार संजयमामा शिंदे यांची मागणी.

संजय साखरे प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेले लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे 2020 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. साहित्य व समाजकारणात आण्णाभाऊ साठे यांचे विशेष व उल्लेखनीय योगदान आहे .मागास समाजातून पुढे आलेल्या आण्णाभाऊ यांनी वंचित समाजाच्या व्यथा व वेदना आपल्या साहित्य व शाहिरी कृतीतून अतिशय परिणामकारक मांडलेल्या आहेत .त्याचबरोबर त्यांचे सामाजिक कार्य देखील मोलाचे आहे . म्हणूनच अशा या थोर समाजसुधारकाला भारतातील सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी करमाळ्याचे आमदार श्री संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारकडून भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडून शिफारस करण्यात यावी असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
