करमाळा शहरात 23 जुलै रोजी दोन कोरोना पाॅझिटीव्ह एकुण रुग्णांची संख्या 66

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व ग्रामीण भागात गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी एकूण 11 antigen टेस्ट घेण्यात आल्या असून यामध्ये एकुण 2 पाॅझिटीव्ह व 9 निगेटिव्ह दिसून आले आहेत.
2 पैकी करमाळा शहरातील 1पुरुष फंड गल्ली व 1 महिला मथुरानगर येथील आहे. आजपर्यंत एकुण कोरोना रुग्णांची संख्या 66 झाली आहे अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे.

तसेच RTPCR पध्दतीने 15 स्वाब घेण्यात आले
सर्व अहवाल येत्या दोन दिवसात मिळतील.
करमाळा तालुक्यात आज antigen किट संपल्या असून आजच सोलापूर हुन नवीन 200 किट प्राप्त होतील असे तहसीलदार समीर माने यांनी सांगितले.
