पांगरे ग्रामपंचायतच्यावतीने वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना वृक्षाचे वाटप
पांगरे प्रतिनिधी पांगरे ग्रामपंचायत यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा पांगरे येथील शाळेच्या आवारामध्ये सरपंच प्रा. डाॅ. सौ. विजय दत्तात्रय सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यास एक झाड याप्रमाणे वृक्ष वाटप करण्यात आले. दिलेले झाड स्वतःचे घरासमोर अथवा शेतामध्ये लावून त्याचे संगोपन करण्याचा सल्ला देऊन पुढील वर्षी ते झाड पाहण्यासाठी आम्ही येणार आणि ते झाड चांगल्या पद्धतीने जोपासले असल्यास विद्यार्थ्यांना आणखी झाडे बक्षीस देण्याचे आश्वासन सरपंच यांनी दिले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना झाडाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक संजय जाधव, अतुल घोगरे गुरुजी, सर्व शिक्षक त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य, श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री सचिन पिसाळ, ग्रामपंचायत सदस्य महादेव टेकाळे, भैरवनाथ हराळे, विवेक पाटील, श्रीआदिनाथ कारखान्याचे माजी संचालक ॲड. दत्तात्रय सोनवणे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब गुटाळ, सौदागर दौंड, ग्रामसेवक समाधान कांबळे, ग्रा.प. कर्मचारी गोपाळ कोळी, मच्छिंद्र उघडे आधी उपस्थित होते.
