Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

करमाळा कुर्डूवाडी एस.टी बस नेरले मार्गे सोडण्याच्या मागणीला यश -श्री औदुंबरराजे भोसले

करमाळा प्रतिनिधी करमाळा कुर्डूवाडी बस नेरले मार्गे सोडण्याच्या मागणीला यश  आली आहे अशी माहिती माजी सरपंच हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष औदुंबरराजे भोसले यांनी दिली आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की नेरले हे गाव सुमारे पाच हजार लोकसंख्येचे व गौंडरे साडेतीन हजार लोकसंख्येचे आहे.गावात दोन विद्यालय व डीसीसी बँकेची शाखा आहे .सीना कोळगाव प्रकल्प जवळच आहे .नेरले वरून गौंडरेला अनेक विद्यार्थी व नागरिक बँकेच्या कामासाठी अनेक जातात तसेच आवाटी सालसे निमगाव कोळगाव हिसरे हिवरे येथून देखील अनेक विद्यार्थी व नागरिक बँकेचे कामासाठी प्रकल्पाकडे जाण्यासाठी गौंडरे येथे येतात नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तसेच नागरिकांना कुर्डूवाडी येथून रेल्वेने सोलापूर पुणे मुंबई इतर ठिकाणी जाण्यासाठी व करमाळा येथे शासकीय कामासाठी येणे जाण्यासाठी एसटीची अत्यंत गरज आहे .त्यामुळे करमाळा कुर्डूवाडी बस हिसरे कोळगाव निमगाव गौंडरे नेरले वर वरकुटे बारलोणी मार्गे कुर्डूवाडी व त्याच मार्गे परत करमाळा अशी मागणी नेरले ग्रापं माजी सरपंच श्री औदुंबरराजे भोसले यांनी नेरले व गौंडरे ग्रामपंचायत ठराव सह केली होती व वर्तमानपत्रांमध्ये बातमी देखील आली होती .नागरिकांच्या मागणीचा व वर्तमानपत्राच्या बातमीचा विचार करून दिनांक 26/08/2024 सोमवारी बस सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे नेरले गौंडरे निमगाव हिवरे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .त्यामुळे अधिकारी कर्मचारी व पत्रकार बंधूचे विशेष आभार नागरिकांच्या वतीने मानले आहेत.नागरिकांनी सोमवारपासून कुर्डूवाडी व करमाळा जाण्यासाठी बसने प्रवास करावा अशी विनंती, नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक श्री औदुंबरराजे भोसले यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group