करमाळा येथील सूरताल संगीत विद्यालयाचा सातवा आंतरराष्ट्रीय सूरताल महोत्सव गुणगौरव पुरस्काराने विविध गीतांच्या बहारदार शास्त्रीय नृत्य सादरीकरणाने संपन्न*
करमाळा प्रतिनिधी सूरताल संगीत विद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेला सूरताल महोत्सव विविध गीतांच्या आणि बहारदार शास्त्रीय नृत्य सादरीकरणाने संपन्न झाला. यावेळी कोलकत्ता, गुवाहाटी, दिल्ली, आगरताळा, मुंबई येथील कलाकारांनी कथक नृत्य, सत्रीय, भरत नाट्यम, कुचीपुडी, मणिपुरी नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली.
सुरताल संगीत विद्यालय तालुका करमाळा च्या वतीने सुर ताल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. रश्मी दिदी बागल तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे, सहारा इन्स्टिट्यूट अकलूजच्या डॉ सौ. श्रद्धा जंवजाळ, कृष्णा हॉस्पिटलच्या डॉ .कविता कांबळे, तपश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रेणिक शेठ खाटेर, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, नगरसेविका सौ संगीता ताई खाटेर, नगरसेवक महादेव आण्णा फंड, नगरसेवक अतुल भैया फंड आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सुर ताल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गीते सादर केली. यावेळी विविध आलेल्या कलाकारांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यात प्रामुख्याने डॉ. सुस्मिता झा (दिल्ली) शास्त्रीय गायन सुरताल सरस्वती ॲवॉर्ड, श्रीमती सुमना बायें (कोलकत्ता-वेस्ट बंगाल) कुचिपुडी नृत्य सुरताल नृत्य भुषण, डॉ क्षमा आगरकर- कुलकर्णी (मुंबई-महाराष्ट्र) कथक नृत्य सुरताल नृत्य शिरोमणी, श्रीमती सुदेशना सिन्हा (आगरतळा-त्रिपुरा) मणिपुरी सुरताल नृत्य कलाभुमी , डॉ जुगनू कापडिया (सुरत- गुजरात) भरतनाट्यम सुरताल कलानिधी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर संस्थेचा मानाचा सूरताल जीवनगौरव पुरस्कार हा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गिरधरदास देवी प्रतिष्ठानच्या संचालिका सुनिता देवी यांना प्रदान आला.
यावेळी यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रत्येक कलाकारांना पैठणी साड्या व गोल्ड मेडल देण्यात आले . कार्यक्रमाची सांगता प्राचार्य बाळासाहेब नरारे यांच्या राग भैरवीने करण्यात आली. यावेळी संतोष पोतदार दिगंबर पवार, सुहास कांबळे, सतिश वीर गुरुजी, अशोक बरडेगुरूजी, पत्रकार दिनेश मडके प्राचार्य नागेश माने, बाळासाहेब महाजन,किरणकुमार नरारे, प्रतीक पाटील पुणे ,आदी मान्यवर विद्यार्थी पालक व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब नरारे सुत्रसंचलन डॉअनुराधा शेलार व सौ.संध्या शिंदे मॅडम आभार रेश्मा जाधव यांनी मानले.
