शिरसोडी ते कुगाव पुलाचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे हस्ते भूमिपूजन.
करमाळा प्रतिनिधी
शिरसोडी, ता. इंदापूर, जि. पुणे प्रजिमा- १९१ या रस्त्यावरील शिरसोडी ते कुगांव प्रजिमा- ११ ता. करमाळा, जि. सोलापूर यांना जोडणाऱ्या उजनी धरणाच्या जलाशयावर उच्च पातळीच्या लांब पुलाचे बांधकाम करणे या ३८२ कोटी २२ लक्ष निधी मंजूर असलेल्या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे शुभहस्ते व इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे, करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे या मान्यवरांच्या उपस्थितीत शिरसोडी, ता. इंदापूर येथे आज संपन्न झाले.
उजनी धरणाच्या निर्मितीनंतर तब्बल ४० वर्षांनीं ३८२ कोटी निधी मंजूर करून महायुती सरकारने ऐतिहासिक काम केले आहे .या पुलामुळे फक्त २ गावे जवळ येणार नसून २ तालुके, २ जिल्हे जवळ येणार आहेत त्याचा फायदा दळणवळणासाठी होणार असून महाराष्ट्र राज्याचे २ विभाग जवळच्या मार्गाने जोडले जाणार आहेत.बॅकवॉटर भागातील केळी,ऊस या शेतीमालाची वाहतूक तसेच पर्यटन विकास यासाठी या पुलाचा फायदा होणार आहे.कुगाव ते कळाशी दरम्यान जलवाहतूक करणारी बोट बुडून ५ व्यक्तींचा मृत्यू मध्यंतरी झाला होता.अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी अधिवेशनात पुल बांधकामाची मागणी केली होती.आज प्रत्यक्ष या कामाचे भूमिपूजन होत असल्यामुळे करमाळा तालुक्यासाठी तसेच इंदापूर तालुक्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याची भावना अनेक नागरिक बोलून दाखवत आहेत.
शिरसोडी ते कुगाव पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी करमा तालुक्यातील सचिन गावडे जगदंबा दुध संस्था चेअरमन कुगाव, धनुभाऊ डोंगरे आजिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन, धुळगाव कोकरे आजिनाथ कारखान्याचे माजी संचालक, महादेव कामटे विकास सोसायटीचे चेअरमन, शाबुद्दीन सय्यद, विजय कोकरे, महादेव पोरे, कैलास बोंद्रे ,प्रकाश डोंगरे ,मंगेश बोंद्रे, शंकर बोंद्रे ,अर्जुन अवघडे आदी उपस्थित होते.
