आषाढी एकादशीनिम्मित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी सौ.लता शिंदे यांच्या हस्ते शासकिय महापुजा संपन्न वारकरी काळे दाम्पत्यास मिळाला यावर्षी पुजेचा मान
, पंढरपुर प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासमवेत त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिदे सुन सौ वृषाली शिंदे नातु रूदांश यांनी विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतले. यंदा अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी (ता. नेवासा) येथील सौ. मंगल आणि भाऊसाहेब मोहनीराज काळे या शेतकरी दाम्पत्यास मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांबरोबर महापूजेचा मान मिळाला . भाऊसाहेब आणि मंगल काळे गेल्या पंचवीस वर्षापासून पंढरपूरची वारी पायी करत आहेत. देवगड ते पंढरपूर भास्करगिरी महाराज यांच्या सोबत काळे दाम्पत्य पंढरीची वारी करतात. भाऊसाहेब काळे हे शेतकरी आहेत. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हत मुख्यमंत्री यांच्यासोबत हा मान मिळेल अशी भावना काळे दाम्पत्याची व्यक्त केली आहे.
