करमाळा

शेतकरी सभासद यांच्या हितासाठी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झोळ परिवाराच्या वतीने लढवणार -प्रा.रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी शेतकरी सभासद यांच्या हितासाठी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झोळ परिवाराच्या वतीने आदिनाथ शेतकरी विकास पॅनल च्या माध्यमातून  लढवणार असल्याचे मत प्रा.रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले आहे .आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक तिरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असुन विद्यमान आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे , झोळ परिवार यांच्यामध्ये निवडणूक होत आहे .जगताप बागल गटाने माघार घेतली आहे.आपण मात्र शेतकरी पुत्र असल्यामुळे आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून शेतकरी सभासद यांच्या हितासाठी कल्याणासाठी आपले पॅनल उभा केले आहे . झोळ परिवाराच्यावतीने आदिनाथच्या निवडणुकीतील उमेदवार
जेऊर गट : दत्तात्रय कामटे, शांतीलाल जाधव रवींद्र गोडगे , सालसे गट : अण्णासाहेब देवकर, दत्तात्रय जगदाळे व भारत सरडे पोमलवाडी गट : प्रा. रामदास झोळ, भरत जगताप व प्रकाश गिरंजे. केम गट : सुधीर साळुंखे , बापूराव तळेकर रावगाव गट : कल्याण पाटील, सुभाष शिंदे
हरिभाऊ झिंजाडे उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी : दशरथ कांबळे, अआनुचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिनिधी : दशरथ कांबळे महिला राखीव प्रतिनिधी : इंदुबाई नाईकनवरे व रत्नमाला मंगवडे इतर मागासवर्ग प्रतिनिधी : रवींद्र गोडगे भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग : रामचंद्र खाडे हे उमेदवार निवडणूक रिंगणात असुन आदिनाथ कारखाना ‌ सुस्थितीत आणून यशस्वी गाळप करून ‌शेतकरी सभासद यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी सांगितले

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group