आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासदांच्या मालकीचा राहण्यासाठी आदिनाथ शेतकरी विकास पॅनल कटिबद्ध -प्रा. रामदास झोळसर
करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासदांच्या मालकीचा राहण्यासाठी आदिनाथ शेतकरी विकास पॅनल कटिबद्ध असल्याचे मत दत्तकला शिक्षण संस्थेची अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात विकासनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. .या पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष उमेदवार दशरथ अण्णा कांबळे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ मंगवडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, मकाईचे माजी संचालक व आदिनाथचे उमेदवार सुभाष शिंदे प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब तळेकर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना प्राध्यापक रामदास झोळ सर म्हणाले की आदिनाथ सहकारी साखर कारखाना सभासदाच्या मालकीचा राहिला पाहिजे तसेच शेतकरी सभासदाला न्याय देण्यासाठी आदिनाथ कारखाना हा करमाळा तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असल्याने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपण जगताप गट बागल गट नारायण पाटील गट संजय मामा शिंदे गट यांच्याशी त्यांच्या नेत्यामंडळीची संपर्क साधला परंतु त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याबाबत कार्यकर्ते नेते मध्ये एकमत न झाल्यामुळे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. आदिनाथ कारखाना वाचून येथील शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देऊन शेतकरी सभासद कामगारांना न्याय देण्यासाठी आम्ही झोळ परिवाराच्यावतीने ही निवडणूक लढवत आहोत. निवडणुकीला उभारलेले सर्व उमेदवार शेतकरी परिवार ह संघर्षातून पुढे आलेले असून त्यांना आदिनाथ कारखाना चालवण्याची तळमळ आहे. या निवडणुकीसाठी आम्ही समविचारी लोकांना बरोबर घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहोत. या निवडणुकीमध्ये जगताप गट बागल गट यांनी जरी माघार घेतली असती तरी आदिनाथ कारखाना चालवण्यासाठी जे कोणी चांगले काम करेल त्याला सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. आम्ही त्यांच्याही संपर्कात असून आदिनाथ कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांचे अनुभवाचा फायदा व सहकार्य आम्हाला लाभणार आहे त्यामुळे आम्ही त्यांची मदत घेऊन सदर कारखाना चालवणार आहोत. आमची आतापर्यंतची लढाई ही विचारांची लढाई होती मात्र मनभेद कधीच नव्हते त्यामुळे शेतकरी सभासदांच्या हितासाठी आम्ही त्यांच्याशी संवाद साधून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी सभासद यांनी आम्हाला संधी दिल्यास त्या संधीचे नक्कीच सोने करून दाखवुन आदिनाथ गतवैभव प्राप्त करून देऊ असे मत प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले आहे.
