सुरताल संगीत विद्यालयाच्यावतीने उद्या सकाळी दिवाळी पहाट कार्यक्रम
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयाच्यावतीने दिनांक 4 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी सात वाजता दिवाळी पहाट भक्तिरंग कार्यक्रमाचे आयोजन दत्तपेठ येथे करण्यात आलेले आहे. अशी माहिती संगीत विद्यालयाचे खजिनदार संतोष पोतदार यांनी दिलेली आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षीही दिवाळी पहाट भक्तिरंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात श्री प्राचार्य बाळासाहेब नरारे यांचे गायन होणार असून त्यांच्यासोबत विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी सह गायन व वादन करणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे मार्गदर्शक श्री दिगंबर पवार सर यांनी केले आहे..
