Uncategorized

विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न


करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये यशवंत परिवाराचे आधारस्तंभ,मार्गदर्शक, विद्या विकास मंडळाचे सचिव मा.विलासरावजी घुमरे सर यांच्या 69 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करमाळ्यातील प्रसिद्ध डॉ. हर्षवर्धन माळवदकर, युवा उद्योजक ॲड.विक्रांत घुमरे, युवा उद्योजक श्री.आशुतोष घुमरे या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एलबी.पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, सेवानिवृत्त अभियंते श्री.खुटाळे साहेब, तसेच लेफ्टनंट डॉ. विजया गायकवाड हे उपस्थित होते. या रक्तदान शिबिरांमध्ये 75 रक्तदात्यांनी आपले पवित्र रक्तदान करून सहभाग नोंदवला. महाविद्यालयातील एन.एस.एस व एन.सी.सी. विद्यार्थी व यशवंत परिवारातील सर्व सदस्यांनी आपले रक्तदानाचे पवित्र कार्य करून यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदिप मोहिते यांनी केले तर आभार प्रा. प्रमोद शेटे यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group