Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी २५ लाख निधी मंजूर … आज दि.४ एप्रिल पासून काम सुरू करण्याचे आदेश पारित-आमदार संजयमामा शिंदे


करमाळा प्रतिनिधी
२०२३ चा पावसाळा अक्षरशः कोरडा गेल्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात २०२४ चा उन्हाळा तीव्र स्वरूपामध्ये जाणवू लागला आहे. गावोगावी टँकरची मागणी सुरू असून टँकर भरण्यासाठी चे जलस्त्रोतही आठले आहेत. त्यामुळे उजनी धरणावरून २९ गावांसाठी पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दुरुस्त झाल्यास तालुक्यातील २९ गावांना पाणी मिळण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्यामुळे आपण या संदर्भात जिल्हाधिकारी सो यांना निवेदन दिले होते. त्यानुसार सदर योजनेच्या दुरुस्तीसाठी २४ लाख ९६ हजार ७१२ रुपयांचा निधी मंजूर झाला असून योजना दुरुस्तीचे काम आज दि. ४ एप्रिल पासून सुरू होत असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना आमदार शिंदे म्हणाले की ,तालुक्यातील पाणी प्रश्न अतिशय महत्त्वाचा असून या संदर्भात उजनी धरण मायनस मध्ये जाईपर्यंत आपण दहिगाव उपसा सिंचन योजना चालवली. त्या माध्यमातूनही काही गावातील पाणी प्रश्न दोन-तीन महिन्यापर्यंत सुटला होता. उजनी धरण अवघे ६० टक्के भरल्यामुळे दहिगाव योजना जानेवारी २०२४ मध्येच बंद पडल्यामुळे एप्रिल महिन्यापासून दहिगाव उपसाच्या पट्ट्यामध्ये दुष्काळाने उग्ररूप धारण केलेले आहे. त्यामुळेच आपण जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करणे संदर्भात जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी पत्रव्यवहार केला तसेच चर्चाही केली.
सदर योजना सुरू होणार असल्यामुळे टँकर साठी फिडर पॉईंटही उपलब्ध होतील तसेच २९ गावामध्ये पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे
जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवरून१) जेऊर २) लव्हे ३) शेलगांव ४) वांगी नं.३५) भाळवणी ६) पांगरे ७) कविटगांव ८) बिटरगांव ९) झरे १०) कुंभेज ११) जेऊरवाडी १२) खडकेवाडी १३) पोफळज १४) कोंढेज १५) निंभोरे १६) वरकटणे १७) सरपडोह १८) गुळसडी १९) शेलगांव (क) २०) सौंदे २१) साडे २२) सालसे २३) घोटी २४) हिसरे २५) फिसरे २६) आळसुंदे २७) वरकुटे २८) नेरले २९) गौंडरे या गावांना पाणीपुरवठा होऊ शकतो.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group