रोशेवाडी येथील महेश शिंदे रुग्णास मिळाली एक लाखाची मदत
करमाळा प्रतिनिधी
रोशेवाडी तालुका करमाळा येथील महेश मगनदास शिंदे
यांच्यावर लोणी काळभोर पुणे येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते.
शिंदे यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांनी करमाळ्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे व शिवसेना वैद्यकीय सहायक नागेश चेंडगे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे मदतीसाठी अर्ज करून त्याचा पाठपुरावा केला.
यामुळे शिंदे यांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून एक लाख रुपयाची आर्थिक मदत झाली आहे.
यावेळी बोलताना उपचार झालेला रुग्ण महेश शिंदे मोलमजुरी मी काम करत असल्याने माझी अत्यंत बिकट परिस्थिती आहे . उपचारासाठी माझ्याकडे एक रुपया नव्हता यासाठी रोशेवाडी गावचे समाजसेवक मोरे यांना ही माहिती झाल्यानंतर मोरे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून शिवसेना वैद्यकीय सहाय्यक नागेश चेंडगे यांच्या माध्यमातून माझे प्रकरण करून मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क साधून त्यांना लेखी पत्र व भ्रमणद्वारे मंगेश चिवटे आभार मानले ही मदत केल्यानंतर माझ्या गावातून सुध्दा ग्रामस्थांच्या वतीने मंगेश चिवटे यांचे आभार व्यक्त होत आहे शिवसेना वैद्यकीय कक्षाचे करमाळ्यातले सहाय्यक नागेश चेंडगे , लक्ष्मण सुरवसे , प्रणव घाडगे यांनी मदत केली .