दुष्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा 147कोटीचे वाटप होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शेतकरी मानतायत आभार जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या पाठपुराव्याला यश
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यांवर दुष्काळी निधी पैसे जमा करण्यास सुरुवात केल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.करमाळा तालुक्यासाठी 147 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे दोन सर्कलच्या याद्या पूर्ण झाल्या असून ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहेबारा हजारापासून ते 36 हजार पर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत आहेएक हेक्टर ची मर्यादा वाढवून तीन हेक्टर मर्यादा केल्यामुळे शेतकऱ्यांना भरघोस निधी मिळत आहेगेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होतेसोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकऱ्यांना दोन महिन्यापूर्वीची नुकसान भरपाई मिळालेली आहे मात्र करमाळ्याच्या याद्या प्रलंबित होत्या.यासाठी करमाळा दौऱ्यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे आल्यानंतर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी हा निधी तात्काळ वितरित करण्याची मागणी केली होतीत्याचप्रमाणे यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आतापर्यंत इतिहासात करमाळा तालुक्याला एवढी मोठी कधीच नुकसान भरपाई मिळाली नव्हती ती मिळाल्यामुळे शेतकऱ्याचा आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पैसा हातात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळत आहे
++—-
राजेंद्र मिरगळ
अनुदान प्राप्त शेतकरीमला काल नऊ हजार आठशे रुपये अनुदान प्राप्त झाले असून माझ्यासोबत माझ्या भाऊव नातेवाईकांच्या नावावर असलेल्या जमिनीच्या पिकाच्या नुकसानीची भरपाई असे मिळून जवळपास 50 ते 60 हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली आहेआज पर्यंत एवढी मोठी नुकसान भरपाई कधीच मिळाली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार— –संजय वाकडे तालुका कृषी अधिकारी. अनुदान वाटपाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेतआता आधार कार्ड ला थेट बँक अकाउंट नंबर जोडला असल्यामुळे बँक अकाउंट नंबर द्यायची गरज नाही.मात्र केवायसी तात्काळ करून घेतल्यानंतर दहाच मिनिटात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत.
