Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

डॉ.अनिकेत देशमुख यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा मतदार संघाच्या दृष्टीने करमाळा तालुका काँग्रेस कार्यालयास सदिच्छा भेट

करमाळा प्रतिनिधी- माढा लोकसभा मतदारसंघाच्या चाचपणीच्या दृष्टीने डॉ. अनिकेत देशमुख यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील असणाऱ्या सहा तालुक्यांपैकी पाच तालुक्याचा दौरा पूर्ण करून आज करमाळा येथे करमाळा तालुका काँग्रेस आय पक्ष कार्यालयामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप यांच्याशी चर्चा करून करमाळा तालुक्याचा राजकीय अभ्यास जाणून घेतला. डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख एक उच्चशिक्षित नेतृत्व असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांचा विश्वासक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. स्व.गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांचे ते नातू आहेत. 54 वर्ष ज्या गणपतराव देशमुख साहेबांनी सांगोला तालुक्याचे नेतृत्व केलं तसेच ज्या देशमुख कुटुंबाची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू म्हणून आज पर्यंत राहिली आहे त्याच कुटुंबात वाढलेलं हे युवा नेतृत्व व सर्व जाती धर्मातील जनसमुदायाला सदैव सोबत घेऊन जाणारे नेतृत्व अशी त्यांची ख्याती आहे.यावेळी करमाळा तालुक्याच्या राजकारणाविषयी व तालुक्यातील मतदारांची असणारी मानसिकता याविषयी सखोल चर्चा झाली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जर मला माढा लोकसभेसाठी उमेदवारी दिली तर निश्चितपणे लोकसभा मतदारसंघाचा जनतेस अपेक्षित असणारा विकास केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असेही सर्वांना आश्वासित केले. शेवटी बोलताना श्री देशमुख म्हणाले की पक्षाने मला जरी उमेदवारी दिली नाही तरी महाविकास आघाडीच्या वतीने जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला आपण सर्वांनी मिळून बहुमताने निवडून आणणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी करमाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापराव जगताप, रजाक भाई शेख, करमाळा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक घरबुडे, दस्तगीर पठाण, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप,अशोक पाटील, दिलीप फरतडे, रामदास बाप्पा झोळ, व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अशोक दादा घरबुडे व रजाक भाई शेख यांच्या शुभहस्ते डॉ.अनिकेत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group