जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि अवनी फाउंडेशन कडून ट्रस्ट फोर्स फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे संजय सरवदे यांचा गौरव
*करमाळा प्रतिनिधी शजागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि अवनी फाउंडेशन कडून ट्रस्ट फोर्स फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे संजय सरवदे यांना गौरविण्यात आले*
आज मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि अवनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य असा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी अनेक मान्यवर व प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्यावेळी डॉक्टर निवेदिता गजानन एकबोटे अध्यक्षा अवनी फाउंडेशन उपकार्यवाह प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ऑर्गनायझर श्री संतोष स्वामी सर आणि विनोद सर यांच्या हस्ते ट्रस्ट फोर्स फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड चे प्रतिनिधी संजय सरवदे यांचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक उमेदवारांना अवनी फाउंडेशन या संस्थेने अनेक कंपन्यांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून नोकरी मिळून दिल्या यावेळी 35 ते 40 कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. यावेळी अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनीं व अनेक कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
