Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

आ.संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नांना यश… डिकसळ पुलासाठी 55 कोटी निधी मंजुरीचे आदेश …

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या डिकसळ पुलाला 55 कोटी निधी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज 22 डिसेंबर रोजी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा – माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की,आमदार झाल्या पासून आपण राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे डिकसळ पुलासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करत होतो. 23 नोव्हेंबर 2021 रोजी उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या पत्रानुसार डिकसळ पुलासाठी 55 कोटी निधी मंजूर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आज 23 डिसेंबर 2021 रोजी झाली असून पूलासाठी 55 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
पुलासाठी मंजूर झालेल्या 55 कोटी निधीमधून जिल्हा हद्द ते कोंढार चिंचोली- खातगाव ते पोमलवाडी प्रजिमा 3 ला जोडणारा रस्ता प्रजिमा 190 किमी मध्ये मोठा पूल( डिकसळ पुल ) बांधण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये सदर पुलाला निधी मंजूर करण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे प्रयत्नशील होते, परंतु कोरोना च्या कारणामुळे निधी उपलब्ध होऊ शकला नाही.
2021 – 22 या वर्षीच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये सदर पूलासाठी भरीव निधी मंजूर करून घेण्यामध्ये आमदार संजयमामा शिंदे यांना अखेर यश आले आहे .या पूलाला निधी मंजूर झाल्यामुळे तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आता सुटणार आहे आणि करमाळा तालुक्याचा पुणे व अहमदनगर जिल्ह्याला जोडण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group