Thursday, February 20, 2025
Latest:
करमाळा

दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी’ च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने विशेष श्रमसंस्कार शिबिर पोंधवडी येथे विद्यार्थ्यांकडून श्रमदान

करमाळा प्रतिनिधी 
भिगवण, स्वामी-चिंचोली ता. दौंड येथील “दत्तकला औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय” व “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना” यांच्या वतीने आयोजित विशेष ‘श्रमसंस्कार शिबिर’ पोंधवडी (ता. इंदापूर) येथे पार पडले. सात दिवसांच्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबविले.
‘दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी’ च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित, विशेष श्रमसंस्कार शिबिर पोंधवडी येथे पर्यावरण संवर्धन व ग्रामीण भागात शैक्षणिक जनजागृती, ०४ डिजिटल लिटरसी या उपकर्माअंतर्गत पार पडले. संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जेडगे सर, एन, एस. एस. प्रमुख डॉ. सुदर्शन नागराळे, डॉ. प्रीती काळे, प्रा. रोशन जाधव, प्रा. राम निखाते यांच्या देखरेखीखाली हे शिबिर पार पडले.
या शिबिरात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन पोंधवडी गावात ग्राम स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, गावातील मंदिराचे स्वच्छता केली. तसेच विविध तज्ञांची व्याख्याने आयोजित करून कृषी व सामाजिक प्रबोधन केले. या एकूण सात दिवसांत पोंधवडी गावच्या सरपंच सौ. सारिका शिंदे, उपसरपंच डॉ. तुळशीराम खारतोडे, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ भोसले तसेच सर्व ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले. समारोप कार्यक्रमात संस्थेच्या सचिवा सौ.मायाताई झोळ यांनी गावकऱ्यांच्या आभार मानले. फक्त सात दिवस म्हणजे शिबिरापुरतेच श्रमदान न करता, शक्य तेवढ्या वेळा आपण विद्यार्थ्यांसह जनजागृती कार्यक्रम आयोजित करू असे आश्वासन दिले.
तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जिल्हा समन्वयक, डॉ
विलास कर्डिले व विभाग समन्वयक डॉ. अनिल बनसोडे यांनी शिबिरात भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा घुले या विद्यार्थिनीने केले. तर प्रा. राम निखाते यांनी सर्वांचे आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group