स्नेहालय इंग्लिश स्कुलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
करमाळा प्रतिनिधी
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल रोशेवाडी येथे 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचा परिसर तिरंग्याच्या थाटात सजवण्यात आला होता. मुख्य दरवाजावर रांगोळी काढण्यात आली. ठिकठिकाणी तिरंगा व तिरंग्यातील फुग्यांचे डेकोरेशन करण्यात आले होते. सकाळी 7.30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक/अध्यक्ष जयंत दळवी व शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी भारत मातेचे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजनकरून दीप प्रज्वलन केले. यानंतर ध्वजारोहणाचा व ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच राष्ट्रगीत, झेंडा गीत गायन करून भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आप आपले मनोगत व्यक्त केले. प्री प्रायमरी व प्रायमरी सेक्शन च्या ओम महेश कानगुडे व भावेश वेदनाथ गोदारा या दोन विद्यार्थ्यांचा बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला होता यावेळी शिक्षक , कर्मचारी, विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
