Thursday, February 20, 2025
Latest:
करमाळा

सोलापूर येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये करमाळा कोर्ट संघाने प्रथम पारितोषिक चषकाचा मिळवला सन्मान

  करमाळा प्रतिनिधी दिनांक 19,25 व 26 जानेवारी 2025 रोजी सोलापूर कोर्ट प्रीमियर लीग,सोलापूर येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये करमाळा कोर्ट संघाने प्रथम पारितोषिक व चषक याचा मान मिळवला आहे.
सदर स्पर्धा ही सोलापूर कोर्टकर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केली होती.
आयोजित स्पर्धेमध्ये सोलापूर शहर न्यायालीन कर्मचारी व न्यायाधीश साहेब सोलापूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोर्टकर्मचारी तसेच न्यायाधीश व प्रत्येक तालुक्यातील दोन एडवोकेट सदस्य आशा प्रकारे प्रत्येकी संघामध्ये मिळून सदरील स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील न्यायमूर्ती यांचा संघ मिळून एकूण 16 संघामध्ये रोमांचक स्पर्धा पार पडली.
सदरील स्पर्धेमध्ये करमाळा कोर्ट संघाने सोलापूर येथील डिस्टिक डायमंड सोलापूर संघावरती फायनल मध्ये मात करून पहिल्या क्रमांकाचे रोख स्वरूपातील रक्कम व मानाचा चषक हे विजेतेपद पटकावलं आहे.
सदरील स्पर्धेमध्ये करमाळा कोर्टाकडून स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एडवोकेट अमर शिंगाडे तसेच कॉटर फायनल व सेमी फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार एडवोकेट अमर शिंगाडे व फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोर्ट कर्मचारी मधुसूदन धोत्रे व नॉकआउट मॅच मध्ये मॅन ऑफ दि मॅचचा पुरस्कार कोर्ट कर्मचारी उडचंन साहेब तसेच संपूर्ण स्पर्धेमध्ये कर्णधार सचिन कोकरे , शशिकांत शेजुळ,अमोल राऊत,संतोष ओघे, सज्जन यादव, कुंभार,एडवोकेट शेरे ,बारस्कर साहेब कोंडलकर साहेब अतिशय उत्कृष्ट खेळी करून आपापले योगदान संघासाठी दिले.तसेच करमाळा कोर्ट चषकाचा पुरस्कार माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज जी चव्हाण साहेब तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला व सोलापूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सलमान आझमी साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच जिल्ह्यातील सर्व न्यायमूर्ती व कर्मचारी उपस्थित होते .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group