Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

राजुरी गावांमध्ये ग्रामपंचायत मार्फत सुरु झाली ग्राम सुरक्षा यंत्रणा:- सरपंच डॉ. अमोल दुरंदे.

राजुरी प्रतिनिधी. राजुरी गावांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राशन, रॉकेल, ग्रामपंचायत मधील सरकारी योजना, ग्रामसभा, सरकारी कार्यालयाकडून दिली जाणारी माहिती. तसेच गावामध्ये रक्तदान शिबीर,आरोग्य शिबीर, चोरी, दरोडा, आग लागणे, लहान मुल हरवणे, महिलांची छेडछाड, दागिने चोरीला जाणे, दुकान फोडणे, बिबट्याचा हल्ला, विषारी सर्पदंश, पिसाळलेला कुत्रा गावांमध्ये येणे, निधन वार्ता इत्यादी घटनांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचा जास्तीत जास्त वापर करून चोरी दरोडा घटनांवर आपण आळा घालू शकतो.हे अँप ऍक्टिव्ह करून गावांतील प्रत्येकाचे मोबाईल नंबर ऍड करण्यात आले आहे, ज्या वेळी आपत्ती जनक परिस्थिती मध्ये एकाच वेळी 18002703600 या नंबर कॉल केला असता गावातील सर्वांना तसेच करमाळा पोलिस ठाण्याला कॉल जाऊन मदत मिळू शकते, यामुळे अडचणीत असलेल्या वक्तीला मदत मिळणे सोपे जाईल, परंतु या कॉल चा गैरवापर केला असता त्या वक्तीवर पोलीस ठाण्यातुन गुन्हा दाखल होऊ शकतो.तसेच शासकीय योजना शेवटच्या घटका पर्यंत पोहचवणे आता ग्रामपंचायतीला सोपे जाईल.त्यामुळे ज्यांचे मोबाईल नंबर अजून ऍड केले नाही त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा,हि योजना यशस्वी होण्यासाठी राजुरीचे सुपुत्र इंदापूर चे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर साहेब व करमाळा पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुुळे साहेबांनी मार्गदर्शन केले,अशी माहिती सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी दिली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group