श्रमिक ,श्रमजीवी, वंचित ,शेतकरी या सर्वांची मोट बांधून विचार आणि विकास देणारे नेतृत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब -प्रविण बिनवडे
करमाळा प्रतिनिधी
श्रमिक ,श्रमजीवी, वंचित ,शेतकरी या सर्वांची मोट बांधून विचार आणि विकास देणारे नेतृत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब हे होते असे मत वंजारवाडी चे नुतन सरपंच प्रवीण बिनवडे सर यांनी व्यक्त केले ते लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त मौलालीमाळ येथील अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते .
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.श्रीराम परदेशी हे होते
पुढे बोलताना ते म्हणाले की भाजपा सारख्या पक्षांमध्ये वाडी वस्तीवरील बहुजन बांधव पक्षामध्ये आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री असताना अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेऊन प्रशासनामध्ये सुसूत्रता आणण्याचे काम त्यांनी केले
त्यांच्या विचारांचा वारसा युवा पिढीने घ्यावा त्यांचा कार्यकर्ता ते नेता हा संघर्षमय प्रवास निश्चित सर्वांना प्रेरणादायी आहे यावेळी भाजपा सोशल मिडिया तालुकाध्यक्ष नितिन कांबळे ,गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान चे अध्यक्ष सोनु साडेकर,युवा नेते ओंकारराजे निंबाळकर , संजय गांधी योजनेचे नरेंद्रसिंह ठाकुरआदि उपस्थित होते..
