जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेब यांचे संकल्पनेतूनअर्जुननगर येथे दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न
अर्जुननगर. प्रतिनिधी
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेब यांचे संकल्पनेतून आणि इशादीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालय अर्जुननगर येथे सरपंच अश्विनी थोरात यांचे अध्यक्षतेखाली दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले गावातील अपंग बांधवांना ग्रामपंचायत मार्फत पाच टक्के अपंग निधीतून रोख रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले तसेच विविध शासकीय योजना ची माहिती देण्यात येऊन गावातील सर्व अपंग बांधवांची नोंदणी ग्रामपंचायत कार्यालय करण्यात आलीयावेळी ग्रामपंचायत मार्फत अपंग बांधवांचामालमत्ता कर पन्नास टक्के माफ केला जाईल असे सरपंच प्रतिनिधी श्री प्रकाश थोरात यांनी बोलताना सर्वांना सांगितले दिव्यांग बांधवांना जी प शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय कांबळे सर, अमोल राऊत सर यांनी मार्गदर्शन केले अपंग बांधवांच्या वतीने श्री विनोद सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व कार्यक्रम आयोजनाबद्दल जिल्हा परिषद चे ग्रामपंचायत चे आभार मानले सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य अमोल पवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास पवार पत्रकार संतोष पवार पोलीस पाटील नवनाथ पवार संगणक चालक केशव घाडगे सचिन रोकडे आशा सेविका प्रेमाभोगे रावसाहेब पवार पांडुरंग घुगे विलास मुरूमकर इत्यादी व व इतर सर्व अपंग बांधव व ग्रामस्थ हजर होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी रोकडे व आभार प्रदर्शन ग्रामसेवक मनोज लटके यांनी केले केले.
