संघर्षातुन यशस्वी वाटचाल करुन माणुसकीचा धर्म पाळणारे ॲड शिरीष लोणकर यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा
करमाळा प्रतिनिधी संघर्षातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द चिकाटी परिश्रम याच्या जोरावर सर्वसामान्य गोरगरीब जनतेची कामे करून जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करणारे ज्येष्ठ विधी तज्ञ करमाळा तालुका शिवसेनेचे प्रवक्ते ॲड शिरीष लोणकर यांचा वाढदिवस जगदंबा कमलाभवानी ट्रस्ट करमाळा मित्र परिवार वकील संघ यांच्यावतीने मोठया उत्साहात आनंदात संप्पन झाला.
जीवनात आपण काय कमावले तर पैशापेक्षा माणुसकीचा धर्म पाळणारी माणसे कमावली आहेत.ॲड शिरीष लोणकर यांनी आपली वकीली नोटरीच्या माध्यमातुन समाजाची सेवा केली असुन प्रेमाने जिव्हाळयाने माणसे कमावली आहेत. नोटरी स्टाॅफच्यावतीने त्यांचा शाल श्रीफळ केक भरवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी गौतम भालेराव दादा ताकभाते,ऋषी महामुनी,सलोनी शिंदे,भाग्यश्री शिंदे उपस्थित होते. त्यांच्या वाढदिवसानिम्मित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटुन सोशल मिडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
