पवार जनरल हाॅस्पिटलचे डाॅ. रवीकिरण पवार यांचे चिरंजीव ‘डाॅ.अंजिंक्य पवार PG परिक्षेत भाच्चे प्रज्वल खेडकरचे बी.एच.एम.एस परिक्षेत सुयश
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील कंरजे गावचे सूपुत्र पवार जनरल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रविकिरण पवार, सौ योगिता रविकिरण पवार यांचे चिरंजीव अजिंक्य पवार यांनी एम बी बी एस सी शिक्षण पूर्ण केले असून पोस्ट ग्रॅज्युएशन परीक्षेत यश मिळवले आहे. ही परिक्षा साडेतीन लाख विद्यार्थ्यांमध्ये घेतली जाते.एमडी.एम एस. कोर्ससाठी साठी ही परीक्षा घेतली जाते .या परीक्षेमध्ये 800 पैकी 440 मार्क मिळून देशात मेरिट लिस्ट मध्ये येण्याचा सन्मान मिळवला आहे .त्यांचा भाचा प्रज्वल खेडकर यांनीही पंधराशे मार्क पैकी 914 गुण मिळून बीएएमएस च्या फायनल परीक्षेत मोठे यश मिळवले आहे.. डॉक्टर रविकिरण पवार व त्यांच्या पत्नी सौ. योगिता पवार यांनी कोरोनाकाळातही आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची निरपेक्षपणे सेवा करून अनेकांना जीवनदान देण्याचे काम केलै आहे आई वढीलाचा आदर्श घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अंजिक्य पवारने वैद्यकिय क्षेत्रात यशाचे शिखर गाठले आहे तर भाचा प्रज्वल खेडकर यांनी बी.एच.एम.एस. परीक्षेत मोठे यश मिळवले आहे.अजिंक्य पवार व प्रज्वल खेडकर यानी BHMs मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
