करमाळाक्रिडा

गजानन स्पोर्टस करमाळा आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बार्शी संघ विजयी उपविजेता गजानन स्पोर्टर्स क्लब

करमाळा प्रतिनिधी गजानन सोशल अँड स्पोर्टर्स क्लब करमाळा यांच्यावतीने सालाबादाप्रमाणे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धा टेनिस बॉलवर होत्या. या स्पर्धेला जिल्हाभरातून 28 टीम सहभागी झाल्या. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता गजानन विरुद्ध बार्शी या दोन संघांमध्ये फायनल मॅच झाली असून बार्शी संघाने विजेतेपद घेतले आहे गजानन संघाने उपविजेपद मिळवले आहे तसेच तृतीय क्रमांक टेंभुर्णी संघास मिळाला असून चतुर्थ क्रमांक कुगाव या संघास मिळाला आहे.
मॅन ऑफ द सिरीज बक्षीस सायकल मिलिंद दामोदरे व उत्कृष्ट खेळाडू बापू सावंत आणि सचिन गायकवाड या दोघाना देण्यात आले मॅन ऑफ द मॅच शिंदे यांना देण्यात आले
सामना बघण्यासाठी करमाळा शहरातील युवा क्रिकेट प्रेमींनी बरीच गर्दी केली होती शेवटचा फायनल सामना हा फार अटीतटीचा व रोमांचक झाला .सदर किक्रेट स्पर्धा बक्षीस वितरण करमाळा नगरीचे नगरसेवक संजय सावंत, अतुल भैया फंड, नितीन घोलप ,जगदंब स्पोर्ट्सचे कांनगुडे, अभिजीत भाई पाटील, समीर बागवान, चेतन ढाळे, आरशाद शिकलकर इर्शाद शिकलकर अक्षय ढाळे निखिल ढाळे सरपंच योगेश सोरटे सामाजिक कार्यकर्ते सचिन भैय्या गायकवाड सोनूशेठ मल्होत्रा, श्रीकांत शेठ ढवळे ,डॉक्टर गजेंद्र विभुते, संतोष व्यंगलम सुनीलशेठ फुलारी अशा बरेच मान्यवरांनी हजेरी लावली व सर्वांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम माननीय माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी केला व सर्व क्रिकेट प्रेमींचे व मान्यवरांचे गजानन सोशल अँड स्पोर्टर्स तर्फे आभार मानले. गजाननच्या सर्व सदस्यांनी सदर क्रिकेट स्पर्धा पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले संघाचे कर्णधार अमित बुद्रुक मुसा दारूवाले ,अल्ताफ दारूवाले, बापू सावंत, रोहित परदेशी या सदस्यांनी सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच येणाऱ्या काळात नक्कीच करमाळा शहरात एक भव्य अशा नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस गजानन सोशलतर्फे करण्याचा प्रयत्न करू असे माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!