तहसील कार्यालयातील शासकीय कार्यालयामधील कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी केला संप कचेरी मध्ये शुकशुकाट .
करमाळा प्रतिनिधी करमाळयात शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी अचानक बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले असून करमाळा तहसील कार्यालय जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग भूमि अभिलेख विभाग सर्व कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करावी यासाठी काम बंद आंदोलन सुरू केले असून शिक्षकाला जशी पेन्शन योजना लागू झाली त्याच पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यालाही जुनी पेन्शनचा लाभ मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.शासकीय कामकाज करण्यासाठी नागरिक तहसील कार्यालय पंचायतसमिती याबरोबर सर्व सरकारी कार्यालयामध्ये कामासाठी येत असतात पण ऐनवेळी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने नागरिकांच्या कामाचं मात्र खोळांबा झाला आहे. अनेकांची कामे यामुळे रखडली आहेत कचेरीत एरव्ही रोज शासकीय कामासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते परंतु ऐनवेळी कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे कचेरी मध्ये शुकशुकाट होता सर्व शासकीय सरकारी कार्यालय ओस पडलेले चित्र दिसत होते. कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन केले यामुळे सरकार पुढे जुन्या पेन्शनचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सर्वसामान्य माणसाचा विचार सरकार करायला तयार नाही सं शासकीय कामे रखडल्यामुळे सरकार या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणार का हा संप लवकर मिटणार का एसटी कर्मचाऱ्यांसारखा हा संप दीर्घ काळ लांबणार का त्यामुळे शासकीय यंत्रणेचा बोजा सर्वसामान्य नागरीकांवर पडणार का असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
