Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीत येण्याची शक्यता….

 

भारतात आता पुन्हा करोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच आता कोविड सुपरमॉडेल पॅनलने धक्कादायक माहिती दिली आहे. यानुसार भारतात ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे २०२२ च्या सुरुवातीलाच करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.तसेच फेब्रुवारीत तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू असू शकतो. सध्या भारतात दररोज नव्याने आढळणाऱ्या करोना रूग्णांची संख्या ७,५०० पर्यंत गेलीय. मात्र, ओमायक्रॉन विषाणूने डेल्टाची जागा घेतल्यानंतर हा आकडा आणखी वाढून भारतात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. नॅशनल कोविड १९ सुपरमॉडेल कमिटीच्या सदस्याने याबाबत माहिती दिली.नॅशनल कोविड १९ सुपरमॉडेल कमिटीचे प्रमुख विद्यासागर म्हणाले, “भारतात ओमायक्रॉनची तिसरी लाट येऊ येऊ शकते, पण ती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. ही तिसरी लाट फेब्रुवारी २०२२ मध्ये येण्याची शक्यता आहे. देशभरातील नागरिकांमध्ये तयार झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे ही लाट सौम्य असेल. सध्या भारतात दररोज जवळपास साडेसात हजार नवे रूग्ण आढळत आहेत. मात्र, ओमायक्रॉन विषाणूने डेल्टा विषाणूची जागा घेण्यास सुरुवात केल्यानंतर नव्या रूग्णांची संख्या वाढेल.”

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group