आ. संजयमामा शिंदे यांनी तालुका वासियांचा विश्वास सार्थ ठरविला : माजी आ जयवंतराव जगताप
*आ संजयमामा शिंदे यांनी तालुका वासियांचा विश्वास सार्थ ठरविला : माजी आ जयवंतराव जगताप*. करमाळा प्रतिनिधी – सध्या सुरु असलेल्या राज्य शासनाच्या हिवाळी अधिवेशना मधे पुरवणी अर्थसंकल्पामधे करमाळा मतदार संघातील रस्ते, आरोग्य आदी विविध विकास कामांसाठी जवळपास १२० कोटी रुपयांची भरीव तरतुद करून घेण्यात आ .संजयमामा शिंदे यांना यश आल्यामुळे संजय मामांनी तालुका वासियांचा विश्वास सार्थ ठरविल्याचे मत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले आहे . यामधे दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा डिकसळ पुलासाठी ५५ कोटी रुपयांची तरतूद केलेबद्दल , जातेगाव ते टेंभुर्णी रस्ता NHAI कडे वर्ग करणेसाठी राज्य शासनाची ना -हरकत घेणे, आवाटी सबस्टेशनला मंजूरी, दहिगाव व कुकडीची नियमीत आवर्तने, कृष्णा खोरे महामंडळा कडून दहिगाव योजनेचा लाखो रुपयाचा वीज बील भरणा, भुसंपादनाचा मोबदला,एमआयडीसी ला चालना, कॉटेज हॉस्पीटलमध्ये सिझेरीन सह अन्य अत्याधुनिक सोयीसुविधा देणे, शेततळ्यांचे थकीत अनुदानास मंजूरी, आमदार आपल्या दारी उपक्रम राबविणे यासह रस्ते, वीज, पाणी आरोग्य या बाबतीत आ . शिंदे करीत असलेल्या कामांमुळे व सातत्याने मतदार संघातील विकास कामांबाबत शासन दरबारी करत असलेल्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त होत असलेचेही माजी आमदार जगताप यांनी सांगीतले .
