करमाळा

करमाळा येथे संत निरंकारी मंडळाच्यावतीने मानव एकता दिनानिमित्त रक्तदान शिबिरामध्ये२२५ जणांचे रक्तदान

करमाळा प्रतिनिधी 
*मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात २२५ जणांनी* रक्तदान केले . या शिबीराचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. या प्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सोलापूर झोनचे ज्ञानप्रचारक महादेव बिराजदार महाराज , क्षेत्रीय संचालक बाळासाहेब पवार , टेंभूर्णी ब्रँचमुखी अनिल पवार , खरेदी विक्रि संघाचे चेअरमन – शंभूराजे जगताप , कमलाई साखर कारखान्याचे चेअरमन विक्रम दादा शिंदे, दत्तकला शिक्षण संस्थेचे चेअरमन रामदास झोळ , शिवसेनेचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे , राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार , जि.प सोलापूरचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड , सरपंच रविंद्र वळेकर, प्रमोद बदे, पत्रकार अशपाक सय्यद , दिनेश मडके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्ञान प्रचारक महादेव बिराजदार महाराज व क्षेत्रीय संचालक बाळसाहेब पवार यांनी संत निरंकारी मंडळाच्या आध्यामिक व सामाजिक समाजोपयोगी मानवतावादी कार्याची माहिती दिली .
या शिबीरात रक्तसंकलनाचे काम बार्शी येथील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी , सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल , श्रीम. गोपाबाई दमाणी ब्लड बँक यांनी उत्कृष्टपणे केले .
*अनेक मान्यवरांनी स्वतः रक्तदान करून संत निरंकारी मंडळाच्या मानवतावादी निष्काम कार्याचे कौतूक केले* .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवादल अधिकारी रमेश वारे , भैरू वळेकर ,वैशाली सरडे , मुकुंद साळूंके , अंगद पडवळे, बप्पा धडस , एकनाथ निमगीरे, मनधीर शिंदे तसेच सर्व महिला व पुरुष सेवादल यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल शिंदे यांनी केले तर सर्व रक्तदात्यांचे मान्यवरांचे व रक्तपेढीच्या सर्व डॉक्टरांचे आभार करमाळा ब्रँच मुखी पोपट थोरात यांनी मानले .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group