Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

मराठ्यांना ओबीसीमधुन आरक्षण मिळावे याकरिता मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील नेतृत्वाखाली सात ॲागस्ट रोजी सोलापूर येथे होणाऱ्या शांतता रॅलीसाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे-माऊली पवार

करमाळा  प्रतिनिधी मराठ्यांना ओबीसीमधुन आरक्षण मिळावे याकरिता मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणाची लढाई लढत असुन हा समाज आपल्या हक्काच्या आरक्षणापासुन वंचित राहिल्यामुळे रस्त्यावर उतरला असुन सोलापूर येथे मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या होणाऱ्या सात ॲागस्ट रोजी होणाऱ्या शांतता रॅलीसाठी मराठा समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाचे समन्मावयक माऊली पवार यांनी केले.आहे. करमाळा येथील विकी मंगल कार्यालय येथे सकल मराठा समाजाच्या शांतता रॅली नियोजन बैठकीत ते बोलत होते.पुढे बोलताना माऊली पवार यांनी म्हणाले की, सरकार जाणून-बुजून मराठा व इतर समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे.वास्तविक आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी ही लढाई अनेक वर्षांपासून लढत आहोत.२०१६ साली मोठा मोर्चा काढला होता.पण मराठा समाजाला नेतृत्व नसल्यामुळे हा लढा यशस्वी होत नव्हता . मराठ्याचे 58 मोर्चे निघाले पण मराठ्यांना न्याय मिळाला नाही. मराठ्यांच्या सुदैवाने निस्वार्थ मराठा समाजाचा लढा हा कोणत्याही जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नसून मराठा समाजाच्या भावी पिढीचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आहे. लोकसभेला याचा अनुभव सरकारला आला आहे .मराठा समाजाच्या मतांना डावलून कुठलाच पक्ष सत्तेत येऊ शकत नाही. त्यामुळे जो पक्ष आम्हाला ओबीसींतून आरक्षण मिळण्यासाठी सहकार्य करेल त्यांचाच विचार करून आम्ही येणाऱ्या विधानसभेला मतदान करणार आहोत. आमच्या लेकरा बाळांच्यासाठी  आम्ही कुठल्याही पक्षाला गट ताटाला बांधील नसून आमचे जो काम करीन मनोज जरांगे पाटील ज्यांना मतदान करायला सांगतील  त्यांना आम्ही मतदान करून निवडून आणु जो आमच्या विरोधात काम करून आमची दिशाभूल करेल त्यालाही पाडून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही . कारण हा सध्या परिस्थितीमध्ये आमच्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी सरकारने सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सर्व मराठा समाज बांधवांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. करमाळा येथे विकी मंगल कार्यालय येथे झालेल्या या बैठकीला प्रा. गणेश देशमुख, प्रा. शिवाजी शिंदे, जीवन यादव, वैभव पवार यांच्यासह जिल्ह्यातील मराठा समन्वयक उपस्थित होते. करमाळा तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्राचार्य मिलिंद फंड यांनी सूत्रसंचालन केले. या बैठकीला शहर व तालुक्यातील हजारो मराठा समाज बांधव उपस्थित होते.दि. ७ ऑगस्ट रोजी सोलापूर येथील छत्रपती संभाजी महाराज आणि पार्क चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात होणार आहे. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील आल्यानंतर यांची सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group