जगद्गगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्यावतीने जेऊर येथे 7 जानेवारीला महारक्तदान शिबिराचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने 4 जानेवारी रोजी जेऊर येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन. करमाळा प्रतिनिधी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज दक्षिणपीठ नाणिजधाम यांच्यावतीने अध्यात्मा बरोबरच मानव कल्याणाचे सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातीला महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते यावर्षीही जगदगुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रेरणेतून करमाळा तालुक्यातील जेऊर येथे मंगळवार दिनांक 7जानेवारी 2025 रोजी कर्मयोगी कै. गोविंद बापू पाटील सभागृह बाजार तळ येथे सकाळी नऊ ते सहा या वेळेमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रक्तदान हे जीवनदान श्रेष्ठदान असून रक्त हे कुठल्याही प्रयोगशाळेत तयार करता येत नाही.परमेश्वराने मानवाला दिलेली मोठी देणगी आहे . त्यामुळे मनुष्य जीवाचे प्राण वाचत असल्याने रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले गेले आहे. त्यामुळे रक्तदान करून या पुण्यकर्मात सहभागी व्हावे असे आवाहन स्व स्वरूप सांप्रदाय करमाळा तालुक्यच्यावतीने करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज सांप्रदाय शिष्य साधक भाविक भक्त व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.