वाशिंबे येथील भूयारी मार्गासाठी रश्मी दीदी बागल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या कडे निवेदनाद्वारे केली चार कोटी ऐंशी लाखांची मागणी.
वाशिंबे प्रतिनिधी
वाशिंबे ता.करमाळा येथील वाशिंबे ते राजुरी.व वाशिंबे ते पारेवाडी गावाला जोडनारा पाण्याची टाकी परिसरातील रस्ता रेल्वे पुनर्वसनामुळे किलोमीटर क्रमांक 322/3 ते 322/4 या ठिकाणी बंद झाला. त्यामुळे शालेय विध्यार्थी,ग्रामस्थ, आबालवृद्धांना गावात येण्यासाठी जीव धोक्यात घालून लोहमार्ग ओलांडून प्रवास करावा लागतो.त्यामुळे किलोमीटर क्रमांक ३२२/३ते३२२/४ याठिकाणी दुचाकी,छोटी चार चाकी वाहन, पायी जाण्यासाठी भूयारी मार्ग करावा.हा भूयारी मार्ग बनवण्यासाठी चार कोटी ऐंशी लाख रुपये रक्कमेची आवश्यकता आहे.तरी आपण या रकमेची तरतुद करावी अशी मागणी बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली.
